वाहतूक आराखडा तयार करा
वाहतूक आराखडा तयार करा
द्रुतगती मार्गाबाबत उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यानुसार पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले आहेत.
गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक २० तास प्रयत्न करून गॅस गळती रोखली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोलवसुली थांबविण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
----
परिस्थिती आव्हानात्मक!
- प्रवाशांना झालेला त्रास दुर्दैवी आहे. एमएसआरडीसीने तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. हे काम आव्हानात्मक हाेते. जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ज्ञांना बोलवण्यात आले.
- या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स वाटप करण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

