पालिका रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटींचा करार११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा १३.६० कोटींचा खर्च
११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा १३.६० कोटींचा खर्च

पालिका रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटींचा करार११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा १३.६० कोटींचा खर्च ११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा १३.६० कोटींचा खर्च

Published on

पालिका रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटींचा करार
उपनगरीय ११ रुग्णालयांसाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती; उंदीर-कचरा नको, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई महापालिकेने उपनगरीय भागांतील ११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षांसाठी रुग्णालयांच्या साफसफाईची जबाबदारी खासगी ठेकेदाराला देण्यात आली असून, रुग्णालयांच्या परिसरात उंदीर, कुत्रे, मांजरे तसेच कीटक अजिबात दिसू नयेत, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे.
पालिकेची रुग्णालये गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेमुळे सातत्याने वादात सापडली आहेत. कूपर, केईएम आणि नायर रुग्णालयांमध्ये कधी उंदरांचा उपद्रव, तर कधी कचऱ्याचे ढीग यामुळे पालिकेवर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने पश्चिम उपनगरातील सहा आणि पूर्व उपनगरातील पाच अशा एकूण ११ रुग्णालयांसाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली आहे.
या नव्या करारानुसार ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर रुग्णालयातील शौचालयांवर ‘लास्ट क्लिनिंग टाइम’ नोंदवणे आवश्यक असेल, जेणेकरून स्वच्छतेवर नियमित देखरेख ठेवता येईल. ऑपरेशन थिएटर आणि आयसीयूची स्वच्छता व्हॅक्यूम गनच्या सहाय्याने करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या संपामुळे रुग्णालयांची अवस्था बिकट होत असल्याने, कोणताही कर्मचारी संपावर जाणार नाही, अशी अटही करारात समाविष्ट करण्यात आली आहे.

नियम मोडल्‍यास दंड
ड्युटीवर असताना कर्मचारी गणवेशात व ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एखादा कर्मचारी आपल्या शिफ्टमध्ये गैरहजर राहिल्यास ठेकेदाराला प्रतिदिन १,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com