महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये टॉयलेट पॅनलमध्ये अडकलेल्या मुलाची सुरक्षित सुटका

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये टॉयलेट पॅनलमध्ये अडकलेल्या मुलाची सुरक्षित सुटका

Published on

शौचकूपात पाय अडकलेल्या मुलाची सुरक्षित सुटका
मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना

कर्जत, ता. ५ (बातमीदार) : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका चारवर्षीय चिमुकल्याचा पाय रेल्वे डब्यातील शौचकूपात अडकल्याची घटना घडली; मात्र रेल्वे प्रशासन, जीआरपी आणि आरपीएफ जवानांच्या मदतीने या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधावारी (ता. ४) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकात आली. या वेळी एस-२ डब्यातील चार वर्षांच्या मुलाचा पाय शौचकूपातील पॅनेलमध्ये अडकल्याची माहिती मिळताच कर्जत रेल्वे स्थानकावरील कर्मचारी, जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोणावळा रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी कटरच्या मदतीने शौचकूपाचे पॅनेल कापले आणि मुलाचा पाय सुरक्षितरीत्या बाहेर काढला. तसेच त्या चिमुकल्यास पुढील उपचारासाठी लोणावळा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. महालक्ष्मी एक्स्प्रेसला या घटनेमुळे सुमारे एक तास ४५ मिनिटांचा विलंब झाला. या घटनेमुळे रेल्वेतील सुरक्षा व सजगतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com