बसथांब्यांजवळ विद्युत केबल्स उघड्यावर

बसथांब्यांजवळ विद्युत केबल्स उघड्यावर

Published on

बस थांब्यांजवळ विद्युत केबल्स उघड्यावर
कांदिवली पश्चिमेत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कांदिवली, ता. ५ (बातमीदार) : कांदिवली पश्चिमेतील चारकोप परिसरात महात्मा गांधी मार्ग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या अनेक बस थांब्यांच्या परिसरात विद्युत केबल्स अस्ताव्यस्त व चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्याने नागरिक आणि बस प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून या समस्येकडे वीज वितरण कंपनी, बेस्ट व्यवस्थापन, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
कांदिवली पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून, झोपडपट्ट्या, म्हाडा वसाहती तसेच माथाडी कामगारांची मोठी वसाहत आहे. त्यामुळे या भागातील बस प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सध्या अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने काही ठिकाणी नव्याने केबल्स टाकल्या असून, विद्युत बॉक्स बदलण्यात आले आहेत. मात्र, वाढीव केबल्स तसेच काही जुने साहित्य रस्त्यावर आणि पदपथांवर उघड्यावरच टाकण्यात आले आहे.
मुख्य मार्गांवरील अनेक बस थांब्यांच्या बाजूला या केबल्स विचित्र पद्धतीने गुंडाळलेल्या किंवा विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. झाडांच्या बुंध्यांजवळ, पदपथांवर तसेच बस थांब्यांच्या परिसरात पडलेल्या केबल्समुळे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि बेस्ट प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे!
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते आशीष पाटील यांनी सांगितले की, तातडीने रस्त्यावरील व पदपथांवरील अस्ताव्यस्त केबल्स हटवाव्यात. प्रवासी किंवा नागरिकांचा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com