अजितदादांना मुरबाड तालुका सर्व पक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमातून अखेरचा दंडवत
मुरबाडमध्ये अजितदादांना सर्वपक्षीयांचा अखेरचा दंडवत
मुरबाड ता. ५ (वार्ताहर) ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने मुरबाड तालुका सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहरातील विविध पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी दादांना आदरांजली वाहिली.
आमदार किसन कथोरे, माजी आमदार गोटीराम पवार, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष किसन तारमळे, आरपीआय सेक्युलरच्या ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, प्रा. धनाजी दळवी, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोस्टे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतिक हिंदुराव, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे, उल्हास बांगर, उपजिल्हा प्रमुख कांतीलाल कंटे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, रिपब्लिकन तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, प्रतीक हिंदुराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक नेते, नगरसेवक, समाजसेवक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

