मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील शव पेटीची वातानुकूलन यंत्रणा बंद

मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील शव पेटीची वातानुकूलन यंत्रणा बंद

Published on

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचा सावळा गोंधळ
नातेवाईकांना न कळवताच मृतदेह हलविला
मुरबाड, ता. ५ (बातमीदार) ः मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयातील शवपेटीची वातानुकूलन यंत्रणा बिघडल्याने एका मृत महिलेचा मृतदेह नातेवाईकांना न विचारता परस्पर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याची घटना घडली आहे. या प्रकारावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून रुग्णालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयाला दोन दिवसांत नवीन शवपेटी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती कमलाकर भोईर व तालुका आरोग्य पर्यवेक्षक संभाजी भोईर यांची लहान बहिण कल्पना दळवी यांचे मंगळवारी (ता. ३) एका अपघातात निधन झाले. त्यांचा पंचनामा करून मृतदेह मंगळवारी मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथील शवपेटीमध्ये ठेवण्यात आला. त्यासाठी सही देखील घेण्यात आली होती, असे संभाजी भोईर यांनी सांगितले. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात गेले असता हा मृतदेह रातोरात टोकवडे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजले. त्यामुळे त्यांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी टोकावडे येथे जावे लागले. या घटनेमुळे त्यांचे नातेवाईक संतप्त झाले होते.

अंधारात ठेवून मृतदेहाची परस्पर रवानगी
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात माझ्या बहिणीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यावेळी पंचनाम्यावर माझी सही घेण्यात आली होती व सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले होते. रात्री मृतदेह हलवण्यापूर्वी मला माहिती देण्यात आली नाही. सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मी गेलो असता मला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले, असे संभाजी भोईर यांनी सांगितले आहे.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी असलेली शवपेटी नादुरुस्त झाली आहे. ही शवपेटी दुरुस्त करण्यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न सुरू होते. या प्रकरणात कर्तव्यावर असलेले डॉ. रवींद्र साबळे यांनी मृताच्या भावाची संमती न घेताच मृतदेह टोकावडे ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबत नातेवाईकांनी लेखी तक्रार केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसात वातानुकूलन यंत्रणेसह नवीन शवपेटी बसविण्यात येणार आहे.
- डॉ. संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com