मराठी मुलगी व्यवसाय करणारच
मराठी मुलगी व्यवसाय करणारच!
एकता सावंतच्या शोर्मा गाडीचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
डोंबिवली, ता. ५ : बाहेरून येणारे लोक येथे येऊन व्यवसाय करत असतील, तर मराठी मुलगीही हक्काने व्यवसाय करणारच. मनसे सुरुवातीपासून एकता सावंतच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि यापुढेही राहील, असा ठाम इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला. डोंबिवलीत अनेक अडथळे आणि संघर्षानंतर मराठी तरुणी एकता सावंत हिची खाद्यपदार्थांची गाडी पुन्हा सुरू झाली असून, त्याचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
डोंबिवली स्थानक परिसरात एकता सावंत शोर्माची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र, पालिका प्रशासनाने केवळ तिच्यावर कारवाई केल्याने तिने समाजमाध्यमातून आपली व्यथा मांडली होती. ‘‘परप्रांतीय फेरीवाल्यांना अभय दिले जाते, मग मराठी मुलीलाच व्यवसाय करण्यापासून का रोखले जाते,’’ असा सवाल करत तिने मनसेकडे मदत मागितली होती. राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार अविनाश जाधव यांनी तिला भेटून ''बिनधास्त व्यवसाय कर'' असा शब्द दिला होता.
उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाला प्रश्नावर जोरदार फटकेबाजी केली. नियम सर्वांना सारखे असावेत. ‘‘स्टेशनपासून १५० मीटर परिसरात फेरीवाले नसावेत यासाठी आम्ही २०१७ पासून लढा दिला. आज २०२६ उजाडले तरी परिस्थिती तीच आहे. जर परप्रांतीय फेरीवाले तिथे बसू शकतात, तर मराठी मुलं का नाही? केडीएमसीने जर कारवाई करायचीच असेल, तर २०१७ मध्ये आम्ही दिलेल्या पत्रावर नऊ वर्षांत काय केले, याचे उत्तर आधी द्यावे. ज्या दिवशी पोलिस आणि प्रशासन नियमाने वागेल, त्या दिवशी आम्हीही नियमांचे पालन करू.’’
मराठी उद्योजकांना बळ
या वेळी ‘मनविसे’चे अध्यक्ष प्रतीक देशपांडे, राहुल कामत यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मराठी तरुण-तरुणींच्या व्यवसायावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्या पाठीशी मनसेचा खंबीर पाठिंबा असेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

