कुर्ल्यातील वाहतूक कोंडी सोडवा
कुर्ल्यातील वाहतूक कोंडी सोडवा
सकल हिंदू समाजाची पालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) : कुर्ला परिसरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली गर्दी आणि वाहतूक कोंडी या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने कुर्ला एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर तसेच कुर्ला पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. या भेटीत कुर्ला परिसरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होत असून, वाहनचालकांनाही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची बाब मांडण्यात आली. तसेच या समस्येमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
सहाय्यक आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांनी या विषयाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी दिली. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कुर्ल्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
फोटो - 844
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

