अनधिकृत बांधकामांवर कारवाई अटळ
तोडक कारवाईपूर्वी अनधिकृत दुकानदारांना दिलासा
प्रशासनाकडून आठवड्याची मुदत
बदलापूर, ता. ५ (बातमीदार) ः शहरातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या वतीने तोडक कारवाई सुरु आहे. परंतु, यामध्ये दुकानदार, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांना अधिकृत जागेत स्थलांतर करण्यासाठी आठवडाभराची मुदत प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे संबंधित दुकानदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे.
माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी अनधिकृत व्यावसायिकांचे साहित्य नष्ट होऊ नये तसेच आणि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत तोडक कारवाई स्थगित करावी, अशी मागणी पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड व नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आणि शहरातील अनधिकृत जागांमध्ये व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे गाऱ्हाणे ऐकून घेत पालिका प्रशासनाने आठवडाभराची मुभा दिली आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई अटळ असून, या प्रक्रियेत व्यावसायिकांचे अनावश्यक नुकसान होऊ नये यासाठीच आठवड्याची मुदत देण्यात आल्याची माहिती मारुती गायकवाड यांनी दिली. शहरातील सर्व भागांचे सर्वेक्षण करून पहिल्या यादीतील अनधिकृत बांधकामांसह इतर अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. आठवड्याची मुदत संपल्यानंतर तोडक कारवाईत कोणतेही अडथळे सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

