वीज समस्यांनी शिरवणेतील नागरिक त्रस्त

वीज समस्यांनी शिरवणेतील नागरिक त्रस्त
Published on

वीज समस्यांनी शिरवणेतील नागरिक त्रस्त
नगरसेविका माधुरी सुतार यांची पाहणी; उपाययोजनांचे आश्वासन
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत येणाऱ्या शिरवणे गावातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वीजविषयक समस्यांना सामोरे जात आहेत. वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाची वीज आणि जुन्या यंत्रणेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. या समस्यांबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत भाजपच्या नगरसेविका माधुरी सुतार यांनी शिरवणे गावाला प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी संवाद साधला व समस्या समजून घेतल्या.
या पाहणीदरम्यान नगरसेविका सुतार यांनी वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणींबाबत सविस्तर माहिती घेत संबंधित विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

चौकट
वीज यंत्रणेत सुधारणा गरजेची
भेटीदरम्यान नागरिकांनी विजेचे मोडकळीस आलेले खांब, जुने व धोकादायक तारे, अपुरी ट्रान्स्फॉर्मर क्षमता, नवीन ट्रान्स्फॉर्मर व सबस्टेशनची आवश्यकता, फॉल्टी मीटर तसेच वीज वितरणातील अनियमितता अशा विविध समस्या मांडल्या. या सर्व मुद्द्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com