

गुरुवार ठरला प्रचारवार
शेवटच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
पोयनाड, ता. ५ (बातमीदार) : शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या सार्वत्रिक मतदानासाठी गुरुवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. पोयनाड विभागात शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पोयनाड परिसरात आंबेपूर व शहापूर या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांत आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणात शिवसेना स्वबळावर लढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोयनाड विभागात आंबेपूर व शहापूर मतदारसंघात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात सांबरी, आवेटी, कुर्डुस, हेमनगर, कुसुंबळे, वाघवीरा, कातळपाडा, पिटकीरी, काचळी, मेढेखार, श्रीगाव, देहेन, भाकरवड, शहाबाज, कमळपाडा, पांडवादेवी, पोयनाड, आंबेपूर, पेझारी, दिवलांग, बांधण, नागझरी, वाघोडे, वडवली, ताडवागळे, दळवी खरोशी, कोळघर, बोपोली या मार्गे बाइक रॅलीचे आयोजन केले होते. सायंकाळी तळाशेत येथे या बाइक रॅलीचा समारोप करण्यात आला, तर शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात धेरंड, शहापूर, पळी, तिनवीरा, चरी, खिडकी, सातघर, पेढांबे, वाघ्रण, चिंचवली, नारंगी, रांजणखार, मानकुळे, शिरवली, हाशिवरे, कावाडे, बेलपाडा, रेवस, सारळ नवखार मार्गे बारांचा देव मंदिर नवखार येथे या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
फोटो - 865
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.