शूटिंग बॉलचा वसईमध्ये थरार
शूटिंग बॉलचा वसईमध्ये थरार
देवाळेतील स्पर्धेत राज्यभरातून संघ येणार
विरार, ता. ५ (बातमीदार)ः वसईच्या देवाळेत ५ वी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा शनिवारपासून (ता.७) सुरू होणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबवणाऱ्या रंजन क्रीडा मंडळातर्फे कै. मनीष भारत वर्तक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवण्यात आली आहे.
वसई, विरार, पालघर, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, मालेगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बुलढाणा, विदर्भ, फुलंब्री, संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मणेराजुरी, खानापूर, धरणगुट्टी, सांगली शहर, जामनेर येथील नामवंत संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते व समाज मंदिर ट्रस्ट,वसईचे अध्यक्ष नितीन म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. तर बसीन कॅथोलिक को - ऑप.बँकेचे संचालक व सुख संपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष ओनीलजी आल्मेडा, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू व सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
------------------------------
स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव
प्रथम क्रमांक - २१,०००/चषक
द्वितीय क्रमांक - १५,०००/- चषक
तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी - १०,०००/
पाच ते आठ क्रमांक प्रत्येकी रोख - ५,०००/
उत्कृष्ट शूटर, पंचर, डिफेंडर - १,०००/
सर्वोत्कृष्ट खेळाडू - १,०००/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

