उलव्यात नुसी सिफेरर भवन प्रकल्पाचे भूमिपूजन

उलव्यात नुसी सिफेरर भवन प्रकल्पाचे भूमिपूजन

Published on

उलव्यात नुसी सीफेअर्स भवन प्रकल्पाचे भूमिपूजन
नाविक व कुटुंबीयांच्या कल्याणासाठी महत्त्वाची पायाभरणी
उलवे, ता. ५ (बातमीदार) : नॅशनल युनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडिया (नुसी) यांच्या वतीने नाविक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी प्रस्तावित नुसी सीफेअर्स भवन व वसतिगृह प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच उलवे, नवी मुंबई येथे उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे नाविकांसाठी सुरक्षित, परवडणारी व आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध होणार असून स्वतंत्र वसतिगृहासह कल्याण केंद्र उभारण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू द्रुतगती मार्ग व जवळच्या रेल्वे स्थानकाशी उत्तम जोडणी असलेल्या ठिकाणी हा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यामुळे प्रवास, विश्रांती व कामाच्या दरम्यानच्या संक्रमण काळात नाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या समारंभाचे उद्घाटन इंटरनॅशनल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स फेडरेशनचे महासचिव स्टीफन कॉटन यांच्या हस्ते झाले. या वेळी आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी व सागरी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय पाठबळातून सामाजिक सुरक्षा बळकट
या प्रकल्पाला मिळालेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा भारतातील नाविकांसाठी दीर्घकालीन व शाश्वत कल्याणकारी सुविधा उभारण्याच्या नुसीच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक असल्याचे ‘नुसी’चे महासचिव- खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com