दुखवट्यात रायगडमध्ये मंत्री काय करत होते

दुखवट्यात रायगडमध्ये मंत्री काय करत होते

Published on

दुखवट्यात रायगडमध्ये मंत्री काय करत होते
सुनील तटकरे यांचा भरत गोगावलेंना अप्रत्यक्ष टोला

खालापूर, ता. ५ (बातमीदार) : जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांसाठी खालापूर तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांनी कॉर्नर सभा घेतल्याने त्यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना तटकरे यांनी दुखवट्यात रायगडमध्ये मंत्री काय करत होते, याची पूर्ण माहिती असल्याचा टोला हाणला. तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सभा घेतल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे निधन झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात खंड पडला होता. प्रशासनानेदेखील मतदानाची तारीख पुढे ढकलत दोन दिवसांची मुदतवाढ दिल्याने पुन्हा प्रचाराला जोर चढला आहे. खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात विस्तवदेखील जात नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसाठी आणि परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांसाठी सुनील तटकरे यांनी साजगाव येथे कॉर्नर सभा घेतली. दुःखद वातावरण असताना तटकरे प्रचारासाठी फिरत असल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्याला उत्तर देताना तटकरे यांनी अजित पवारांच्या शिकवणीप्रमाणे कार्यकर्त्यांना ताकद आणि बळ देण्यासाठी सभा घेतल्याचे सांगत मंत्री भरत गोगावले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com