उलव्यात कमी दरात दर्जेदार वस्तूंचा उपक्रम
उलव्यात कमी दरात दर्जेदार वस्तूंचा उपक्रम
आगरी कोळी उद्योग समूहाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
उलवे, ता. ५ (बातमीदार) : उलवे येथील समाजबांधवांना कमी दरात दर्जेदार व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आगरी कोळी उद्योग समूहाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने लांगेश्वर मंदिर, मोरावे, उलवे नोड येथे समूहाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात आले.
बैठकीदरम्यान समूहाचे सहकारी विजय पाटील यांनी सर्व नामांकित कंपनींच्या खाद्यतेलांची डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्याची माहिती दिली. तसेच हितेश मढवी यांनी विकसित केलेले ‘एके’ ब्रँडचे परफ्युम बाजारात आणण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या माध्यमातून समाजबांधवांना बाजारभावापेक्षा कमी दरात खाद्यतेल व इतर दर्जेदार उत्पादने उपलब्ध होणार आहेत.
सदस्यांनी मासिक अन्नधान्याची आवश्यकता यादी देऊन एपीएमसीमधून थेट होलसेल दरात खरेदी करून वस्तू वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोट
‘सहकारातून समृद्धीकडे’ या ब्रीदवाक्याशी निष्ठावान राहून समाजातील गुणवत्तापूर्ण उत्पादने समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम आर्थिक सबलीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल.
— विनोद गणपत कोळी, संस्थापक, आगरी कोळी उद्योग समूह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

