तळा कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा
तळा कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा
स्वातंत्र्य सेनानी प्रभाकर दादा देशमुख व डॉ. प्र. म. जोशी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन
तळा, ता. ५ (बातमीदार) : द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे २ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वातंत्र्य सेनानी प्रभाकर दादा देशमुख आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा तसेच डॉ. प्र. म. जोशी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहा महाविद्यालयांतील संघांनी सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेत पीएनपी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. द. ग. तटकरे महाविद्यालय, माणगाव यांना द्वितीय, तर जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स यांना तृतीय क्रमांक मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. वादविवाद स्पर्धेत पुरेसे स्पर्धक नसल्यामुळे तृतीय क्रमांकाचे एकच पारितोषिक देण्यात आले, ते पीएनपी महाविद्यालयास मिळाले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. संजय धनावडे (प्रभारी प्राचार्य, एम. एम. जगताप महाविद्यालय, महाड) व प्रा. प्रसन्न म्हसाळकर (वरदा ताई तटकरे महिला महाविद्यालय, धाटाव) यांनी काम पाहिले. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, अध्यक्ष मंगेश देशमुख, सचिव महेंद्र कजबजे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भगवान लोखंडे यांनी केले, तर आभार डॉ. तृप्ती थोरात यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

