अलिबागमध्ये श्री खंडोबा पालखीनिमित्त क्रिकेट स्पर्धा उत्साहात

अलिबागमध्ये श्री खंडोबा पालखीनिमित्त क्रिकेट स्पर्धा उत्साहात

Published on

अलिबागमध्ये श्री खंडोबा पालखीनिमित्त क्रिकेट स्पर्धा उत्साहात
साई बल्लाळेश्वर वाल्मिकी जलसा ‘ए’ संघाचा जय मल्हार चषकावर कब्जा
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) : अलिबाग कोळीवाडा येथे श्री खंडोबा पालखीनिमित्त साई बल्लाळेश्वर वाल्मिकी जलसा मित्रमंडळातर्फे मंगळवारी (ता. ३) जय मल्हार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत साई बल्लाळेश्वर वाल्मिकी जलसा ‘ए’ संघाने मरूआई किल्लेपाडा ‘ए’ संघाचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ३३ हजार ३३३ रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या संघाला २२ हजार २२२ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते व सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते झाले. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा टिकून राहिली.

चौकट
खेळाडूंच्या कामगिरीला विशेष दाद
वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज सर्वेश भगत, उत्कृष्ट फलंदाज विराज पेरेकर, इमर्जिंग प्लेअर कार्तिक खामिस, तर मॅन ऑफ द सिरीज मृणाल वरसोलकर यांना सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी कोळी बांधवांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com