महापौर वाहनाच्या नोंदीवरून तर्कवितर्क
वाशी, ता. ५ (बातमीदार) : महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना महापालिकेकडून अधिकृत वाहन देण्यात आले; मात्र या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विशेष बाब म्हणजे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातच नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यरत आहे. महापालिकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली शासकीय वाहने ही एमएच-४३ पासिंगचीच आहेत. असे असताना महापौरपदावर विराजमान झालेल्या सुजाता पाटील यांना मुंबई शहरामध्ये नोंदणी झालेली एमएच-०१ एफएम २९०५ क्रमांकाची असलेली गाडी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौरांना देण्यात आलेले ही गाडी नवी मुंबईऐवजी मुंबईची का आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जणांकडून ही केवळ प्रशासकीय बाब असल्याचे सांगितले जात असले, तरी महापालिका सर्वोच्च पदावरील व्यक्तीसाठी स्थानिक नोंदणीचे वाहन अपेक्षित होते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर महापालिका प्रशासनाकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

