मानवतेचा घर’ संकल्पनेतून पुजारी कुटुंबाला हक्काचे घर
पुजारी कुटुंबाला हक्काचे घर
‘मानवतेचे घर’ संकल्पना बनली आधार; वाळेकर कुटुंबाचे साश्रु नयनांनी आभार
अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) ः मानवसेवा हीच ईश्वर सेवा या तत्त्वाला कृतीची जोड देत शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबविले आहेl. भास्करनगर येथील मरियम्मा मंदिरातील पुजारी कुटुंबाला ‘मानवतेचे घर’ या संकल्पनेतून सुसज्ज व हक्काचे घर प्रदान करण्यात आले. या घराचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ५) पार पडले.
अंबरनाथ पश्चिमेकडील भास्करनगर परिसरात असलेल्या मरियम्मा देवी मंदिराचे पुजारी दक्षिण भारतीय असून त्यांचे घर मोडकळीस आले होते. पावसाळ्यात परिसराची पाहणी करत असताना या कुटुंबाची दयनीय परिस्थिती नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर ‘मानवतेचे घर’ या संकल्पनेतून पुजारी कुटुंबासाठी नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. निवडणुकीपूर्वीच या घराचे भूमिपूजन करून घराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. दरम्यान, अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा गृहप्रवेश सोहळा पार पडला. स्वतःचे सुरक्षित व सुसज्ज घर मिळाल्याने पुजारी कुटुंबाने वाळेकर कुटुंबाचे साश्रु नयनांनी आभार मानले. या सोहळ्याला राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मानवतेचे घर’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १४ गोरगरीब व गरजू नागरिकांना हक्काची घरे बांधून देण्यात आली आहेत. ही सामाजिक बांधिलकी पुढील काळातही कायम राहील, अशी भावना अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केली.
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
याच निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिवसेना व मुस्लिम बेलदार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अरविंद वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शासकीय सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरसेवक संदीप भराडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

