मोठी दुर्घटना टळली ः रसायन तज्ज्ञ

मोठी दुर्घटना टळली ः रसायन तज्ज्ञ

Published on

मोठी दुर्घटना टळली ः रसायनतज्ज्ञ

खालापूर, ता. ५ (बातमीदार) ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील गॅस गळती ३२ तासांनंतर आटोक्यात आली; परंतु यादरम्यान मोठी दुर्घटना घडली असती तर त्याचे भयंकर परिणाम झाले असते, अशी भीती रसायनतज्ज्ञांनी व्यक्त केली. मोठी दुर्घटना टळली, असे त्यांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांनी सांगितले, की २० डिसेंबर २०२४ मध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या एलपीजी गॅस गळतीपेक्षा कितीतरी पटीने मोठी हानी मुंबई-पुणे मार्गावर झाली असती. उलटलेल्या टॅंकरमध्ये २१ टन प्रोपेलिन गॅस होता. जवळपास सहा टन गॅस गळतीमुळे हवेत पसरला. उर्वरित १४ टन अन्य टॅंकरमध्ये भरण्यात आला. अत्यंत ज्वलनशील गॅस असतानादेखील काही फुटावरून विरुद्ध लेनमधून सुरू असलेली वाहतूक, शेकडो पोलिस कर्मचारी, स्वयंसेवक, अग्निशमन कर्मचारी, रसायनतज्ज्ञ या सर्वांच्या प्राणांशी गाठ होती. उलटलेला टॅंकर उभा केल्यानंतरदेखील गॅस गळती सुरू होती. त्यामुळे टॅंकर सुरक्षित जागी हलवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. रात्री १.४५ वाजता सर्व परिस्थिती आटोक्यात आली आणि ३२ तास स्फोटाच्या उंबरठ्यावर असलेला द्रुतगती मार्ग आणि परिसर सुरक्षित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com