डॉ. संग्राम पाटील यांची कृती संघटित प्रयत्नांचा भाग?

डॉ. संग्राम पाटील यांची कृती संघटित प्रयत्नांचा भाग?

Published on

डॉ. संग्राम पाटील यांची कृती संघटित प्रयत्नांचा भाग?

‘एलओसी’ रद्द करण्यास पोलिसांचा विराेध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ब्रिटनस्थित डॉक्टर आणि यूट्युबर डॉ. संग्राम पाटील यांचा पर्यटक व्हिसावर भारत दौरा आणि हा देशाबाहेर राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बदनामीकारक, निंदनीय आणि चिथावणीखोर मजकूर पोस्ट करणे हा एका मोठ्या, संघटित प्रयत्नाचा भाग असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. ही चिंतेची बाब असून, चौकशी आवश्यक असल्याचेही त्यात म्हटले आहे.

एक परदेशी नागरिक पर्यटक व्हिसावर भारतात येतो. तो परदेशातून पंतप्रधानांबद्दल कथित निंदनीय आणि अश्लील बाबी ऑनलाइन का पोस्ट करत होता? अशी कृत्ये घटनात्मक पदावरील व्यक्तीला बदनाम करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मोठ्या, संघटित प्रयत्नाचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पोलिस उपायुक्तांनी (गुन्हे) प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याच कारणास्तव पाटील यांची चौकशी आवश्यक आहे. ते ब्रिटनला परतल्यास त्यांचा माग काढणे कठीण होईल, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच पाटील तपासात सहकार्य करत नसून न्यायवैद्यक विश्लेषणासाठी वैयक्तिक उपकरणे व ओळखपत्रे सादर करण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे.
डॉ. पाटील यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये, भाजपसह त्याच्या प्रमुख नेत्यांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी आणि चुकीची माहिती नमूद केली होती. याप्रकरणी पाटील यांच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
----
प्रतिज्ञापत्रातील आक्षेप
- पाटील यांनी भारतात आल्यानंतरही त्यांच्या समाजमाध्यमांवर अपमानजनक आणि चिथावणीखोर मजकूर पोस्ट करणे सुरूच ठेवले आहे.
- पाटील यांनी एका पोस्टमध्ये मुंबईतील बोरिवली, एमएचबी कॉलनीच्या हद्दीत घडलेल्या हिंसेच्या घटनेला हेतुपुरस्सर आणि नियोजित संघर्ष म्हणून संबोधित केले आहे. सामाजिक सलोखा, भावना बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com