लाकडाची खुंटी, पीओपीची मलमपट्टी सरस

लाकडाची खुंटी, पीओपीची मलमपट्टी सरस

Published on

लाकडाची खुंटी, पीओपीची मलमपट्टी सरस
अत्याधुनिक यंत्रे ठरली कुचकामी
एक्स्प्रेसवरील ३२ तास कोंडीचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : मुंबई-पुणे महामार्गावर ३२ तास झालेली कोंडी ही मागील २६ वर्षांतील पहिलीच घटना होती. प्रोपेलीनसारखा अतिज्वालाग्रही वायूची गळती थांबवण्यासाठी जर एखादी ठिणगी पडली असती तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. यासाठी आयपीसीएल, बीपीसीएल यांसारख्या कंपन्या, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होऊनही काहीही करू शकले नाहीत. केवळ गॅस बाहेर पडून जाण्याची वाट पाहणे एवढाच मार्ग शिल्लक होता. अशा परिस्थितीत अत्याधुनिक यंत्रे कुचकामी ठरत असताना एका ‘गावठी’ उपायाने गॅसची गळती ९५ टक्क्यांनी कमी केली. बाजूच्या जंगलातून तोडून आणलेल्या एका लाकडाची खुंटी आणि १५ किलो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मलमपट्टीने हे काम केले.
या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले, की ‘वजा २० अंश तापमानात काम करणे खूपच आव्हानात्मक होते. तीन ठिकाणी वॉल्व्ह अशा ठिकाणी लिकेज झाले होते की ते वॉल्व्ह बदलून नवे वॉल्व्ह टाकणे शक्य नव्हते. तेथे दाखल आयपीसीएल, बीपीसीएल कंपन्यांच्या तज्ज्ञांनीही अनेक उपाय केले; परंतु गळती थांबवता आली नाही. एनडीआरएफच्या टीमने पूर्ण गॅस वाहून जाईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला. २१ टन गॅस वाहून जाण्यासाठी किमान तीन दिवस लागले असते.’ गुरुनाथ साठेलकर हे अपघात घडल्यापासून ते संपूर्ण गॅस दुसऱ्या टॅकरमध्ये घेण्यापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. ते सांगतात, ‘तोपर्यंत लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा तिथेच थांबवाव्या लागल्या असत्या. अशा परिस्थितीही एका लहानशा ठिणगीने आगीची भडका उडाला असता, तर आगीचा भडका बोगद्याच्या बाजूने जास्त उडाला असता, यातून पूर्ण डोंगरच कोसळला असता. त्याचबरोबर हजारो प्रवाशांचाही जीव धोक्यात आला असता. यामुळे सावधानता पाळणे हाच एकमेव मार्ग राहिला होता. अशा परिस्थितीत एकाही व्यक्तीला दुखापत न होता मोठी दुर्घटना टाळण्यात आली. यासाठी केलेल्या उपायांमध्ये लाकडाची खुंटी आणि पीओपीची मलमपट्टी कामाला आली. तीन ठिकाणी टॅंकरचा पत्रा फुटून अडीच ते तीन इंचांचे भोक पडले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत होता. त्या ठिकाणी वेल्डिंग शक्यच नव्हते. अखेर रात्रीच्या वेळी बाजूच्या जंगलातून तोडून आणलेल्या लाकडाच्या खुंटीने चांगलेच काम केले. त्या खुंटीच्या भोवताली पीओपीची मलमपट्टी केल्यानंतर गॅस गळती आटोक्यात आली.’
...
अधिकारी घटनास्थळी
अपघातानंतर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे, कोकण आयुक्त संजय दराडे, वाहतूक अधीक्षक तानाजी चिखले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल आदी अधिकारीही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com