अश्लील व्हिडीओ दाखवून शरीरसुखाची मागणी
अश्लील व्हिडिओ दाखवून शरीरसुखाची मागणी
मालाड, ता. ८ (बातमीदार) ः मालाड परिसरात एका ४७ वर्षीय विकृत व्यक्तीने शाळेत जाणाऱ्या अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला अश्लील व्हिडिओ दाखवल्याची घटना शनिवारी (ता. ७) घडली आहे. केवळ व्हिडिओ दाखवून हा नराधम थांबला नाही, तर त्याने या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मालाड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी कांदिवली पश्चिमेतील रहिवासी असल्याचे समजते. शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलींना हेरून त्यांचा पाठलाग करणे आणि संधी मिळताच त्यांना मोबाईलवर अश्लील क्लिप्स किंवा पॉर्न चित्रपट दाखवणे, अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुलीच्या पालकांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता मालाड पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आणि त्याला मालाड परिसरातूनच अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

