

केडीएमसीची विशेष स्वच्छता मोहीम
शहराचे मानांकन उंचावण्याचे महापौरांचे आवाहन
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात ‘डीप क्लीनिंग’ या विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दुर्गाडी किल्ला येथे दुर्गादेवीचे दर्शन घेऊन महापौर हर्षाली चौधरी-थविल आणि उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते या मोहिमेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही विशेष स्वच्छता मोहीम ९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रांत राबवली जाणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता करून स्वच्छतेचे मानांकन उंचावणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेच्या प्रास्ताविकात त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत यात नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांनी म्हटले, तर शहर शाश्वत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मानांकन उंचावण्यासाठी नगरसेवक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गोयल यांनी केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागात प्रभावीपणे मोहीम राबवून शहराचा दर्जा सुधारावा, असे आदेश महापौर हर्षाली चौधरी-थविल यांनी दिले. शहर चकाचक करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपमहापौर राहुल दामले यांनी व्यक्त केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नगरसेवक अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, समिना शेख, गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव, कांचन कुलकर्णी, जतिन प्रजापती तसेच सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी आगस्तिन घुटे आणि पालिकेचे स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.