२० वर्षांपासूनचा राडारोडा हटवण्यास सुरुवात

२० वर्षांपासूनचा राडारोडा हटवण्यास सुरुवात
Updated on

२० वर्षांपासूनचा राडारोडा हटवण्यास सुरुवात
सहाय्यक आयुक्तांचे निर्देश
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : ‘२० वर्षांपासूनचा कचरा आजही कायम’ या मथळ्याखाली रविवारी (ता. ८) प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची महानगरपालिकेने तातडीने दखल घेतली. घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता साजिद सौदागर यांनी अल्ताफ नगर परिसराची पाहणी करून सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून जेसीबी आणि सफाई कामगारांच्या माध्यमातून राडारोडा हटवण्याची कारवाई सुरू केली.
२००६ ते २००८ या कालावधीत लिंक रोड प्रकल्पासाठी हजारो झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी उरलेला कचरा, माती तसेच बांधकामाचा राडारोडा आजतागायत हटवण्यात आला नव्हता. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती. डेंगी, हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची नागरिकांची तक्रार होती.
दोन ते तीन दिवस सातत्याने जेसीबी लावून येथील संपूर्ण राडारोडा हटवण्यात येईल. परिसर स्वच्छ करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अश्‍ाी प्रतिक्रिया एन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त गजानन बेल्लाळे यांनी दिली.
घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता साजिद सौदागर यांनी सांगितले की, आजपासून जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्ता रुंदीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणावर मातीचा ढीग येथे पडून आहे. कचरा हटवणे हे आमच्या विभागाचे काम आहे; मात्र इतर बांधकाम राडारोडा हटवण्याबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com