वाहतूक कोंडीने ग्रामस्थ हैराण

वाहतूक कोंडीने ग्रामस्थ हैराण
Published on

वाहतूक कोंडीने ग्रामस्थ हैराण
मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या काँक्रिटीकरणाचा त्रास
विरार, ता. १० (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील ससुपाडा परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात काँक्रीटीकरणाचे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर १८ डिसेंबर २०२५ पासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, रुग्णवाहिका, दैनंदिन प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीचा मोठा फटका दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडथळे येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासंदर्भात भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह संबंधित प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र, उपाययोजना झाली नसल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रभावी नियोजन करण्यात आले नाही. उलट, विनाकारण लावलेल्या अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे.
-----------------------------
आंदोलनाचा इशारा
विनाकारण लावलेल्या बॅरिकेडिंग होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समिती आक्रमक झाली आहे. या संस्थेने संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद दिली असून, आठवडाभरात काम पूर्ण केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com