

‘हरित वसई’ची बंगलुरूत चर्चा
राष्ट्रीय पुरस्काराने डॉमिनिका डाबरे यांचा सन्मान
विरार, ता.१० (बातमीदार)ः ‘हरित वसई’साठी वसईच्या डॉमिनिका डाबरे यांनी ४० वर्षांपासून सर्वस्व पणाला लावले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा भारतीय बिशप परिषदेद्वारे राष्ट्रीय पुरस्कार देऊन बंगलुरू येथे सन्मान करण्यात आला.
भारतातील आदिवासी, वंचित समूह, पर्यावरण व नागरिकांच्या प्रश्नावर कार्य करणाऱ्या व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. देशातील १९ नामवंत व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. अशा प्रतिष्ठित पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून डॉमिनिका डाबरे यांची निवड झाल्याने अखिल वसई धर्मप्रांताचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहेत. बंगलोर येथे संपूर्ण भारतातील १७४ धर्मप्रांताच्या ''भारतीय बिशप परिषदे''च्या ३७ व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आर्चबिशप थाळियत, व्हॅटिकन मधून आलेले कार्डिनल कुवाकोड ह्यांच्याहस्ते मानचिन्हे तसेच कार्डिनल ॲन्थनी पुला, कार्डिनल फेराओ, कार्डिनल क्लीमिस, आर्चबिशप थट्टिल यांना शाल प्रदान करण्यात आली. यावेळी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉन्रड संगमा यांनी युवा पिढीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच के.जे.जाॅर्ज (कर्नाटक सरकार) यांनी सर्व क्षेत्रात कार्यरत राहण्याविषयी सांगितले.
------------------------------
योगदानाबद्दल कृतज्ञता
डॉमिनिका डाबरे यांनी पुरस्कारासाठी देशातील नावाजलेल्या व्यक्तीसोबत पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल परिषदेचे आभार व्यक्त केले. तसेच आजपर्यंतच्या प्रवासात वसई, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.