वाणगावात सूर्यफूल हसले !!!!

वाणगावात सूर्यफूल हसले !!!!
Published on

सूर्यफुलामुळे बळीराजाचे चांगभलं
डहाणू तालुक्यात नगदी पीक घेण्याकडे कल
वाणगाव, ता. १० (बातमीदार) : मधाचे उत्पादन, स्थानिक तेल घाण्यांसाठी सूर्यफुलांना मागणी असते. त्यामुळे नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून, सूर्यफुलांची शेती वरदान ठरत आहे.
डहाणू तालुक्यातील वाणगावजवळ कोलवली गावातील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी सेंद्रिय खते वापरून सूर्यफुलाची शेती फुलवली आहे. बाजारात येणाऱ्या खाद्य तेलाकडे पाठ फिरवून घरच्या घरी लागवड करून सूर्यफुलापासून तेलनिर्मिती आणि उरलेल्या पेंडीचा उपयोग जनावरांसाठी खाद्यस मधाचे उत्पादन वाढण्यासही मदत होत असल्याने कमी खर्चात सूर्यफूल लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सहा गुंठे क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड केली होती. त्यातून २० किलो शुद्ध खाद्यतेलाची निर्मिती केली होती.
--------------------
पोषक वातावरण
पालघर जिल्ह्यात रब्बीस उन्हाळी हंगामात सूर्यफूल लागवडीला पोषक वातावरण असल्याचे समजले. गेल्या वर्षीच्या अनुभवातून एक एकर क्षेत्रावर घरच्याच घरी तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खते वापरून सूर्यफुलाची शेती फुलली आहे. १० मार्चपर्यंत फुलाची काढणी होणार आहे.
----------------------------
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व
- सूर्यफुलाच्या बियांमध्ये साधारणपणे ४० ते ५५ टक्के तेलाचे प्रमाण असते. एक लिटर तेल काढण्यासाठी सुमारे २ ते २.५ किलो बियांची आवश्यकता असते. सूर्यफूल तेल उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सूर्यफूल तेलामध्ये ६९% लिनोलेईक आम्ल असते, जे कोलेस्टेरॉल कमी करते.
- मधमाश्या परागीभवन घडवून आणतात. त्यामुळे मधाचेही उत्पन्न वाढते, सूर्यफुलाच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. परिसरात मधमाश्या नसतील तर परागीभवन होण्यासाठी फुलोरा अवस्थेत सकाळी ८ ते ११ यावेळेस एका आड एक दिवस हस्त परागीभवन करावे लागते.
---------------------------
सूर्यफुलाचे फायदे :
- बिया काढून घाण्यातून तेल गाळले जाते.
- चोथ्याचा (पेंडीचा) उपयोग खताबरोबर जनावरांना खाद्य.
- मधमाशी पालन, दुग्धव्यवसाय
-----------------------------
शुद्ध खाद्यतेल, उत्पादन, पेंड आणि मधमाश्यांना आकर्षित करणारे पीक असल्याने मधाचे उत्पादनही वाढत आहे. शुद्ध तेलाची निर्मिती करून वर्षभर घरगुती तेलाची गरज भागवता यावी, या दृष्टिकोनातून सूर्यफूल लागवडीचा निर्णय घेतला आहे.
- अनिल पाटील, सूर्यफूल उत्पादक शेतकरी, कोलवली (वाणगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com