मुलुंडमध्ये रंगणार ‘स्वरालयातील तुळस’ कार्यक्रम
मुलुंडमध्ये रंगणार ‘स्वरालयातील तुळस’ कार्यक्रम
मुलुंड, ता. १० (बातमीदार) ः पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या चतुरस्त्र गायकीचे दर्शन घडवणारा ‘स्वरालयातील तुळस’ हा विशेष संगीत कार्यक्रम येत्या १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, कऱ्हाडे ब्राम्हण संघ, मुंबई आणि मुलुंड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात केतकी भावे-जोशी, श्रुती पाध्ये-कुळकर्णी, मृणाल नाटेकर भिडे, मंजिरी भिडे, धनंजय पुराणिक, केदार भागवत, व्यंकटेश कुलकर्णी आणि दीपाली केळकर आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना वीणा नाटेकर यांची असून, माणिक वर्मा परिवार तसेच विविध मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

