बेकायदा फेरीवाल्यांना अभय

बेकायदा फेरीवाल्यांना अभय
Published on

बेकायदा फेरीवाल्यांना अभय
गठित समिती कार्यान्वित नसल्याचा फटका
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील वाढत्या बेकायदा फेरीवाल्यांवर नियंत्रणासाठी पालिकेने फेरीवाला समिती गठित केली आहे, परंतु आठ महिने उलटल्यानंतरही समिती कार्यान्वित झालेली नसल्याने शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढतच आहे.
शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या दररोज वाढत आहे. रेल्वे स्थानक परिसर, नव्याने विकसित होत असलेल्या रस्त्यांवर फेरीवाले बस्तान बसवत आहेत. फेरीवाल्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शिवाय जागोजागी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. भाईंदर, मिरा रोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर नियंत्रणासाठी पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. या फेरीवाल्यांना परवाना देता यावा, यासाठी फेरीवाला समिती गठित केली आहे. वर्षभरापूर्वी ३० मे रोजी फेरीवाला संघटनामधून निवडणुकीद्वारे समितीवर बारा सदस्य नियुक्त झाले आहेत. त्यानंतर आयुक्तांनी सदस्यांचीही निवड केली आहे, पण सहा महिने उलटल्यानंतरही समिती कार्यान्वित झालेली नसल्याने शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे.
-------------------------------------
परवाना वाटप रखडले
फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी फेरीवाला क्षेत्र निश्चित करून त्यांना परवाना दिला जाणार आहे. फेरीवाला क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास मनाई केली जाणार आहे. फेरीवाला समितीच्या कार्यक्षेत्रात ही सर्व काम येत आहे, परंतु समितीच कार्यान्वित झाली नसल्याने ही सर्व कार्यवाही रखडली असून, बेकायदा फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मोकळीक मिळाली आहे.
----------------------------
समितीची कार्यान्वित झाली नसल्याने बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. समितीने काम सुरू केल्यास फेरीवाल्याना परवान्यांचे वाटप करून त्यांना व्यवसायासाठी जागा निश्चित करून दिल्या जातील. यामुळे पालिकेचे उत्पन्नही वाढेल.
-ओमप्रकाश अगरवाल, सदस्य, फेरीवाला समिती
---------------------------------
फेरीवाला समिती सदस्यांची नावे अधिसूचनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहेत. त्याची अधिसूचना जारी झाली की समितीची बैठक बोलावून फेरीवाला धोरण निश्चित केले जाईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, भाईंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com