कोंडी फोडण्यासाठी प्रायोगिक तत्वावर अधिसूचना

कोंडी फोडण्यासाठी प्रायोगिक तत्वावर अधिसूचना
Published on

कोंडी फोडण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना
- आमदार केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. या वेळी झालेल्या निर्णयांची माहिती केळकर यांनी समाजमाध्यमांना दिली. शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे अशा विभागांत वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. अवजड वाहने, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे, यासाठी शहरात दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात त्याबाबत मागणी करण्यात येईल, असे केळकर यांनी सांगितले. या वेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ, वाहतूक विभागाचे अधिकारी गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त भोईर, ढोले तसेच नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे आदी उपस्थित होते.
…………….
चौकट
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत काही बदल करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेशन परिसरात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांबरोबरच आरटीओचे अधिकारीदेखील उपस्थित असावेत, अशा सूचना केल्या असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनीदेखील वाहतूक कोंडी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com