सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये ५,८६८ घरांचे लवकरच वितरण

सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये ५,८६८ घरांचे लवकरच वितरण
Published on

सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये ५,८६८ घरांचे लवकरच वितरण
विरार, ता. १० (बातमीदार) : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत वसई येथील सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये सन २०२६ पासून ५,८६८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात मोठ्या एकात्मिक टाउनशिपपैकी एक असलेल्या या प्रकल्पाच्या फेज १ मध्ये इमारतीनुसार घरांचे हस्तांतरण होणार आहे. ‘सर्वांसाठी घर’ या केंद्र सरकारच्या अभियानाला या प्रकल्पामुळे मोठे बळ मिळणार असून वसई हे मुंबई ४.० विकास आराखड्यातील महत्त्वाचे निवासी केंद्र म्हणून पुढे येत आहे.
या प्रकल्पात अत्याधुनिक प्रीकास्ट व ३डी कास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. १ बीएचके घरांची किंमत २२.५ लाख रुपये असून, त्यात २.५ लाख रुपयांची थेट सरकारी सबसिडी मिळणार आहे. काही इमारतींसाठी ऑक्युपेशन सर्टिफिकेट प्रक्रियेत असून लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे.
चौकट
परवडणाऱ्या घरांसोबत गुणवत्तेवर भर
सुरक्षा स्मार्ट सिटीचे प्रमोटर जश पंचामिया यांनी सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर घरे वितरित करणे ही केवळ बांधकामाची कामगिरी नसून, परवडणाऱ्या घरांमध्येही दर्जा, नियोजन व दीर्घकालीन मूल्य जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com