

घरफोडी प्रकरणातील आरोपींना अटक
मुरबाड पोलिसांची धडक कारवाई
सरळगाव, ता. १० (बातमीदार) : घरफोडीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगारांना अटक करून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे.
मुरबाड शहरातील माऊली नगर परिसरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील दत्तकृपा इमारतीत २४ जानेवारीला भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची तक्रार मुरबाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, अनमोल मित्तल आणि उपविभागीय पो. अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे, उपनिरीक्षक श्याम आरमळकर, पोलिस हवालदार रामदास शिंदे, नितीन घाग, राहुल गावडे, धनराज देवरे, अर्जुन पारधी यांचा समावेश होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासा दरम्यान पोलिसांनी शेरा चव्हाण आणि सद्दाम हुसेन जमलुद्दीन खान यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ५.५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
फोटो - 473
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.