मुंबईतील प्रशिक्षणार्थी ना सुरतला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बिघाड झाल्याने केळवा रोड येथे सुखरूप उतरवण्यात आले

मुंबईतील प्रशिक्षणार्थी ना सुरतला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बिघाड झाल्याने केळवा रोड येथे सुखरूप उतरवण्यात आले
Published on

हेलिकॉप्टरचा अपघात टळला, चार जण सुखरूप

पालघर, ता. १० (बातमीदार) ः मुंबईच्या जुहू चौपाटी येथून कॅप्टनच्या प्रशिक्षणासाठी सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचा अपघात मंगळवारी (ता. १०) टळला. या हेलिकॉप्टरमधे इंजिनिअर आणि कॅप्टनसोबत आणखी दोन जण प्रवास करत होते. पश्चिम रेल्वेवरील सफाळे स्थानकानंतर या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असल्याचे रेड अलर्ट सिग्नल यंत्रणेद्वारे समजले, सदर परिस्थिती लक्षात घेऊन केळवा रोड रेल्वे स्थानकाजवळील एका माध्यमिक शाळेच्या मोकळ्या मैदानावर हे हेलिकॉप्टर साधारण दुपारी १२ः३०च्या सुमारास उतरविण्यात आले, मात्र त्यामध्ये दुरुस्ती करून साधारणतः ४० मिनिटांनंतर पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आले.
केळवा पोलिस ठाण्याचे एपीआय दत्ता शेळके यांनी दिलेल्या माहितीनूसार, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे जळगाव रोड परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी तातडीने केळवा पोलिस ठाण्याला कळविले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तातडीने मदतीची विचारणा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्या वेळेस हेलिकॉप्टरसोबत असलेल्या इंजिनिअर आणि कॅप्टन यांनी हेलिकॉप्टर दुरुस्त केले व मुंबईकडे रवाना करण्यात आले. हेलिकॉप्टर असे अचानक आल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com