डहाणू गावात बिबट्याचा थरार; वनविभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

डहाणू गावात बिबट्याचा थरार; वनविभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
Published on

डहाणू गावात बिबट्याचा थरार
वन विभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न

कासा, ता. १० (बातमीदार) : डहाणू तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (ता. १०) पहाटे सुमारे ६ वाजताच्या सुमारास डहाणू गाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाकडून तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
डहाणूतील सुभाष गल्ली परिसरात राहणाऱ्या अनिल कांबळे यांच्या घराच्या मागील बाजूस बंद वाडीमध्ये पहाटे बिबट्या दिसून आला. या घटनेची माहिती तात्काळ डहाणू वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजताच्या सुमारास वन विभागासह ‘वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर’ या प्राणीमित्र संस्थेची टीम घटनास्थळी दाखल झाली.
सध्या संबंधित वाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असल्याने दिवसा बिबट्याला पकडणे अवघड ठरत आहे. अशा परिस्थितीत बिबट्या चवताळून नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने अधिक खबरदारी घेतली जात आहे. बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी त्याला बेशुद्ध करणे आवश्यक असून, त्यासाठी लागणारी ट्रँक्विलायझर बंदूक सध्या उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे गुजरात तसेच मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बंदूक मागवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. याबाबत वन विभागाचे अधिकारी दिवाकर निरंजन यांनी सांगितले, की बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसह सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com