नव्या मालमत्तांची नोंदणी रोडावली

नव्या मालमत्तांची नोंदणी रोडावली
Published on

नव्या मालमत्तांची नोंदणी रोडावली
गतवर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांची घट; महसुलात वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : डिसेंबरअखेर विक्रमी मालमत्तांची नोंदणी झालेल्या मुंबईत नव्या वर्षांत मात्र नोंदणीची आकडेवारी रोडावल्याचे चित्र आहे. जानेवारी २०२६ मध्ये ११ हजार २१९ मालमत्तांची नोंदणी झाली असून, ती जानेवारी २०२५ च्या तुलनेत चार टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान, मालमत्तांची नोंदणी घटली असली तरी सरकारी तिजोरीत १,०१२ कोटी रुपये एवढ्या महसुलाची भर पडली असल्याचे नाइट फ्रँक इंडिया या संस्थेच्या अहवालावरून समोर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९९४ कोटी एवढा महसूल मिळाला होता.

मुंबईत घरांसह व्यावसायिक मालमत्तांना मोठी मागणी आहे; मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नव्या मालमत्तांच्या नोंदणीत घसरण नोंदवली गेली. त्यामुळे पुढील वर्षभर हीच परिस्थिती राहणार का, याबाबत रिअल इस्टेट क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये झालेली मालमत्तांची नोंदणी घटली असली तरी महसुलाचा विचार करता मागील १४ वर्षांत जानेवारीमध्ये मिळालेला महसूल सर्वाधिक आहे. जानेवारीमध्ये नोंदणी झालेल्या घरांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची ४२ टक्के एवढी नोंदणी झाली, तर एक ते दोन कोटी रुपये किमतीच्या घरांची ३३ टक्के, दोन ते पाच कोटी रुपये किमतीच्या घरांची १९ टक्के आणि पाच कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तांची सात टक्के एवढी नोंदणी झाली आहे. जानेवारी २०२५ मधील आकडेवारीचा विचार करता नुकत्याच संपलेल्या जानेवारीत महागड्या घरांच्या नोंदणीत वाढ होताना दिसत आहे, तर एक कोटीपेक्षा कमी किमतीच्या घरांची नोंदणी घटली आहे.

जानेवारीतील मालमत्तांची नोंदणी आणि महसूल
वर्ष मालमत्तांची संख्या महसूल (कोटींमध्ये)
२०१३ - ५,५९९ - २६८
२०१५ - ५,४९७ - २७१
२०१७ - ३,६१९ - २५५
२०१९ - ४,६०५ - ३७१
२०२१ - १०,४१२ - ३०५
२०२३ - ९,००१ - ६९२
२०२५ - १२,२४९ - ९९४
२०२६ - ११,२१९ - १०१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com