''डीप क्लिनिंग'' मोहिमेत हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही

''डीप क्लिनिंग'' मोहिमेत हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही
Published on

स्वच्छता मोहिमेत हलगर्जी केल्यास गय करणार नाही
महापौरांचा पालिका अधिकाऱ्यांना कडक इशारा
कल्याण, ता. १० (वार्ताहर) "शहर स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. मुख्य रस्त्यांसोबतच आता अंतर्गत गल्ल्यांचीही ''डीप क्लीनिंग'' झालीच पाहिजे. या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असा सज्जड दम नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी-थविल यांनी प्रशासनाला दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेची महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी स्वच्छतेच्या कामात काही ठिकाणी त्रुटी आढळल्याने महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मोहिमेचा केवळ कागदावर फार्स नको, तर प्रत्यक्ष जमिनीवर बदल दिसला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी दुकानदार आणि नागरिक घंटागाडी येण्यापूर्वीच कचरा फुटपाथवर टाकताना आढळले. यामुळे भटके कुत्रे तो कचरा विखुरतात आणि परिसरात दुर्गंधी पसरते. यावर महापौरांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक प्रभागातील घंटागाडी येण्याची वेळ निश्चित करून ती नागरिकांना कळवावी. सूचना देऊनही फुटपाथवर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, कचरा कुंड्या वेळेवर रिकाम्या होतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.

"शहर सुंदर करणे हेच माझे स्वप्न"
ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपली महानगरपालिका आणि शहरही सुंदर राहिले पाहिजे. हे माझे स्वप्न आहे, अशा शब्दांत महापौरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहर स्वच्छतेच्या क्रमवारीत अव्वल स्थानी नेण्यासाठी ही मोहीम आता युद्धपातळीवर राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com