कार्तिक रिजन्सी सोसायटीला जमिनीची मालकी
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : बेलापूर येथील कार्तिक रिजन्सी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि विकसक यांच्यातील गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेला जमिनीच्या मालकी हक्काचा वाद अखेर निकाली निघाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोसायटीच्या बाजूने निकाल देत, जिल्हा उपनिबंधकांचा जुना आदेश रद्द केला आहे. तसेच सोसायटीला १४७९.१० चौरस मीटर जमिनीचे मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्तिक रिजन्सी सोसायटीची इमारत बेलापूरच्या किल्ले गावठाण भागातील भूखंडावर उभी आहे. विकसकाने सदनिकांची विक्री करताना करारनाम्यात या जमिनीचा स्पष्ट उल्लेख केला होता. मात्र, इमारतीचे काम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही विकसकाने जमिनीचा मालकी हक्क सोसायटीच्या नावे करण्यास टाळाटाळ केली. याविरोधात सोसायटीने जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेतली होती. २६ ऑगस्टला उपनिबंधकांनी काही तांत्रिक कारणास्तव सोसायटीचा मानीव अभिहस्तांतरणचा अर्ज फेटाळून लावला होता. या निर्णयाला सोसायटीने न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने विकासकाचे सर्व दावे फेटाळून लावताना विकासकाने सदनिका घेणाऱ्यांसोबत केलेल्या करारनाम्यात ज्या जमिनीचा उल्लेख केला आहे, ती जमीन सोसायटीला देणे हे त्याचे कायदेशीर कर्तव्य असल्याचे तसेच विकसकाने सादर केलेली काही सभांचे मिनिट्स किंवा संमती पत्रे ही कायदेशीररित्या मूळ करारनाम्याला बदलू शकत नाहीत, अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

