चंद्रपूर महापौर निवडणुकीसारखा भाजपा चमत्कार भिवंडीत घडवणार ?

चंद्रपूर महापौर निवडणुकीसारखा भाजपा चमत्कार भिवंडीत घडवणार ?
Published on

चंद्रपूर पॅटर्न भिवंडीत?
महापौर निवडणुकीत भाजप-शिंदे गट हालचाली
भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) ः भिवंडीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. हा गुंता सोडविण्यासाठी नव्या समीकरणांची चाचपणी सुरू आहे. अशात, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाने अखेरच्या क्षणी ठाकरे गटासोबत संधान बांधत सत्ता हस्तगत केली. त्याच धर्तीवर भिवंडीतही भाजपा चंद्रपूर पॅटर्न राबवणार या चर्चांना उधाण आले आहे.
भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने काँग्रेससह भाजपाकडून महापौर पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. पण, त्यांच्या प्रयत्नांना समाजवादी, भिवंडी विकास आघाडी, कोणार्क विकास आघाडी सदस्यांनी खोडा घातल्याने सत्तासमीकरण जुळवून येण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम सुद्धा जाहीर केला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये सत्तेचा जांगडगुत्ता सोडवण्यासाठी व बहुमताचे संख्याबळ एकत्रित करण्यासाठी आता भाजपा व शिंदे गटाच्या वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत.
विशेष म्हणजे शिंदे गटाच्या १२ नगरसेवकांनी अजूनही आपल्या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात केलेली नाही. त्यासाठी ते पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले जात आहे. तर भाजपामध्ये महापौर पदाच्या उमेदवारीवरून दोन गट पडले आहेत. त्यामुळे सत्ता कोणाची येणार हे अद्यापही गुलदस्त्यात असून अनेक तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत. अशात, भाजपा वरिष्ठांकडून वेगळी खेळी खेळण्याचा अंदाज वर्तविला जात असून चंद्रपूर पॅटर्न भिवंडीत राबविणा का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाची भूमिका निर्णायक
भाजपा, शिंदे गट, अपक्ष असे मिळून ३५ चे संख्याबळ आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे ४२ चे संख्याबळ आहे. परंतु, बहुमतासाठी आवश्यक ४६ ही मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. दोन्ही आघाड्यांना सत्ता स्थापनेसाठी समाजवादी पक्ष, कोणार्क विकास आघाडी किंवा भिवंडी विकास आघाडीच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. अशातच, कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर भाजप सत्तेत
चंद्रपूर महापालिकेत भाजपने शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवत सत्ता स्थापन केले आहे. चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या, तर ठाकरे गटाला उपमहापौरपद मिळाले. पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या भाजप आणि ठाकरे गटाने सत्तेसाठी एकत्र येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.


पक्षीय बलाबल आणि बहुमताची कसरत
काँग्रेस: ३० जागा (सर्वात मोठा पक्ष)
भाजपा: २२ जागा
शिंदे गट: १२ जागा
शरद पवार गट: १२ जागा
समाजवादी पक्ष: ६ जागा
कोणार्क विकास आघाडी: ४ जागा
भिवंडी विकास आघाडी: ३ जागा
अपक्ष: ०१ जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com