आदिवासी आश्रम शाळेत विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन
आदिवासी आश्रम शाळेत विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन
मुरबाड, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यातील झापवाडी येथील आदिवासी आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन माजी आमदार गोटीराम पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता. ११) करण्यात आले. मुरबाड येथील उद्योजक तथा मुरबाड नगरपंचायतीचे नगरसेवक विनोद नार्वेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नार्वेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रयोगशाळेतील रूमचे बांधकाम केले आहे.
या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ७३० विद्यार्थ्यांसाठी उद्योगपती हिंदुजा यांनी एक हजार ४६० गणवेश भेट म्हणून दिले. या कार्यक्रमासाठी जनसेवा शिक्षण मंडळाचे सचिव पांडुरंग कोर, कोषाध्यक्ष एडवोकेट प्रमोद चौधरी, उद्योजक विनोद नार्वेकर, बाळू चौधरी, मधुकर महोपे, अशोक पठारे उपस्थित होते
माजी आमदार गोटीराम पवार, पांडुरंग कोर आदींची यावेळी भाषणे झाली. आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका संजना घोरड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी
मुरबाड ः विज्ञान प्रयोग शाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

