औद्योगिक नगरीत धुराशी सामना

औद्योगिक नगरीत धुराशी सामना
Published on

औद्योगिकनगरीत धुराशी सामना
तारापूरमध्ये कामगारांचे आरोग्य धोक्यात
बोईसर, ता. १२ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावरील कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यांच्या धुराबरोबर आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना लावण्यात येणाऱ्या आगीमुळे धुराशी सामना कारावा लागत आहे.
कचऱ्याला आग लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात दाट धूर पसरत असून, त्याचा थेट फटका औद्योगिक वसाहतीत ये-जा करणाऱ्या, तसेच विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. श्वसनास त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव होणे, अशा तक्रारी कामगारांकडून सातत्याने व्यक्त केल्या जात आहेत. अनेक कामगारांना कामाच्या वेळेतच धुराचा सामना करावा लागत आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून औद्योगिक क्षेत्रात कचरा टाकला जात असताना त्याला आग लावणे, हा गंभीर प्रकार मानला जात आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने लक्ष देऊन कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी कामगारवर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com