आयुक्तांकडून मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती कामाची पाहणी

आयुक्तांकडून मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती कामाची पाहणी

Published on

मीनाताई ठाकरे रंगायतनाचे काम रखडले
आयुक्तांचा ठेकेदाराला १० दिवसांचा अल्टिमेटम
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) ः शहरातील एकमेव सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीनाताई ठाकरे रंगायतन मागील आठ वर्षांपासून नादुरुस्त असल्याने बंद आहे. या नाट्यगृहाची दुरुस्ती रखडल्याने नाट्यप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशात, आयुक्त अनमोल सागर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली आणि ठेकेदाराच्या संथ कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, उर्वरित कामे येत्या १० दिवसांत पूर्ण करण्याचे कडक निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
मीनाताई ठाकरे रंगायतन नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. वर्षभरापूर्वी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, ठेकेदाराने दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही काम अपूर्णच राहिल्याने आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनमोल सागर यांनी पालिका कार्यकारी अभियंता जमील पटेल, अतिरिक्त शहर अभियंता सचिन नाईक यांसह रंगायतन ठिकाणी भेट दिली. यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराच्या कार्यपध्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, १० दिवसात काम पूर्ण करण्याच्या निर्देश ठेकेदाराला दिली आहे. या दहा दिवसामध्ये कोणतीही प्रगती न झाल्यास संबंधित ठेकेदाराचा कार्यादेश रद्द करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देखील अनमोल सागर यांनी दिली आहे. तर शहर अभियंता यांनी दररोज दोन वेळा कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घ्यावा, अशा सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com