

दहा लाख युवकांपर्यंत भगवद्गीतेचा संदेश
चिन्मय अमृत यात्रेचे खोपोली शहरात स्वागत
खालापूर, ता. १२ (बातमीदार) : चिन्मय मिशन या अध्यात्मिक संस्थेच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त सुरू असलेली चिन्मय अमृत यात्रा खोपोली शहरात उत्साहात दाखल झाली. ही यात्रा ३०० दिवसांत सुमारे ३५ हजार किलोमीटरचा प्रवास करत देशभरातील दहा लाख युवकांना भगवद्गीतेवरील मार्गदर्शन देणार आहे.
यात्रेच्या आगमनानंतर शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास स्वामी अनुकूलानंद यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पंत पाटणकर चौकात ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते स्वामी चिन्मयानंद यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. शहरातून चिन्मय मिशनच्या मोगलवाडी येथील आश्रमापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
स्वामी मेधजानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध स्वामी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिन्मय जीवन आश्रमात स्वामी चिन्मयानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.