मुरूड नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम

मुरूड नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम

Published on

मुरूड नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम
मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांची धडक कारवाई
मुरूड, ता. १२ (बातमीदार) : मुरूड नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (ता. १०) शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जेसीबी, तोडपथकासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुरूड समुद्रकिनारी व्यवसायासाठी उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने दोन टपरीधारकांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. तसेच मच्छीमार्केटजवळील एका घराचे रस्त्यावर आलेले बांधकाम काढून टाकण्यात आले. कुंड्या, झाडे, गटारावरील पायऱ्या व इतर अडथळे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. बाजारपेठेतील हॉटेलच्या पायऱ्या व भाजी विक्रेत्यांचे रस्त्यावर लावलेले टेबलही हटविण्यात आले.
या कारवाईदरम्यान मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अतिक्रमण पथकात कर निर्धारण अधिकारी अनिकेत जगदाळे, शहर अभियंता अनिकेत वाजे, नगररचना सहायक अनिकेत भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट
वाहतूक सुरळीत होणे हा मुख्य उद्देश
अतिक्रमण हटविण्याचा प्रमुख उद्देश शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित व मोकळे रस्ते उपलब्ध करून देणे हा असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com