गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदानातून ओमले कुटुंबाला दिलासा
गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदानातून ओमले कुटुंबाला दिलासा
सरपंच प्रविण आंबार्ले व कृषी विभागाच्या पाठपुराव्यामुळे दोन लाखांचे अनुदान जमा
तळा, ता. १२ (बातमीदार) : तळा तालुक्यातील बेलघर येथे अपघातात मयत झालेले चंद्रकांत काशीराम ओमले यांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. सदर रक्कम २१ जानेवारी २०२६ रोजी मयत चंद्रकांत ओमले यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात आली.
हे अनुदान मिळविण्यासाठी ओमले कुटुंबाने ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्दचे सरपंच प्रविण आंबार्ले यांच्या माध्यमातून कृषी विभागाकडे अर्ज सादर केला होता. या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी हनुमंत कांबळे, मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे, उप कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, सहाय्यक कृषी अधिकारी महानंदा नागुरे व संदीप साळुंके यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. तसेच जिल्हा कार्यालय स्तरावर वंदना शिंदे यांच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
कृषी विभागाच्या कार्यक्षमतेमुळे अल्प कालावधीत अनुदान मंजूर होऊन ओमले कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या सहकार्याबद्दल सरपंच प्रविण आंबार्ले व उपसरपंच अजय सावंत यांचे आभार मयताचे पुत्र मनोज ओमले यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

