‘ग्रंथराज’ ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण
मुरबाड, ता. १५ (वार्ताहर) : सद्गुरू वेदमूर्ती गुरुवर्य श्रीराम गजानन जोशी, श्रीदत्त देवस्थान गुरुपीठ सासणे यांच्या कृपाप्रसादाने मुरबाडनगरीत यंदाचा २९वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात झाला. सालाबादप्रमाणे ‘ग्रंथराज’ ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण मोठ्या श्रद्धा-भक्तीने पार पडले.
सायंकाळी ‘श्रीरामरक्षा’ या विषयावर पुण्याचे ज्येष्ठ प्रवचनकार मंदार शास्त्री खळदकर यांचे प्रभावी प्रवचन झाले. रात्री नऊ ते अकरा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची प्रासादिक कीर्तने रंगली. माउलींचा भव्य पालखी सोहळा आणि दिव्य दीपोत्सव हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. श्रीमहंत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी हजारो भाविकांनी कीर्तन-प्रवचनांचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. सुंदर सजावट, नेटके संयोजन, भक्तीमय वातावरण, रांगोळ्यांची आकर्षक मांडणी, संत-महंतांचे आगमन, मृदुंगाचार्य व गायनाचार्यांची उपस्थिती, व्यापारी वर्ग व एमआयडीसीतील उद्योजकांचे सहकार्य, वैष्णवजन, महिला वर्ग आणि भाविक भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग ही या उत्सवाची वैशिष्ट्ये ठरली. ह.भ.प. दिनेश महाराज पवार संचलित ‘श्रीज्ञानराज आनंद वारकरी शिक्षण संस्थे’चे १४ बालविद्यार्थी या धर्ममहोत्सवातील विशेष आकर्षण ठरले. मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळ आयोजित या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या विश्वस्तांनी अथक परिश्रम घेतले. शांततामय वातावरण निर्मितीसाठी वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी व्यक्त केली.
सोहळ्याचा आनंद
भव्य पालखी सोहळ्यात अश्व, अश्वधारी, घोडागाडीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा, चित्ररथातील धार्मिक देखावे, तुळशी व कळशी घेतलेल्या महिला, टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तन, बँडपथक, भजनी मंडळे आणि महिलांच्या फुगड्यांनी मुरबाड बाजारपेठ दुमदुमून गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

