अवैध शालेय वाहनांवर परिवहन विभागाचा दणका
अवैध शालेय वाहनांना परिवहन विभागाचा दणका
१३ वाहनांवर कारवाई, १.३६ लाखांचा आकारला दंड
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र मोटार वाहन नियम व शासन निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारी तब्बल १३ वाहने आढळून आली. या वाहनांवर कारवाई करण्यात येत एकूण एक लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
या तपासणी मोहिमेत शालेय वाहनांचे सर्व वैध कागदपत्रे, शालेय परवाना, वाहनातील विद्यार्थ्यांची निश्चित संख्या, चालकाचे वैध परवाने तसेच महिला सहकारी (आया) उपस्थिती यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. ही कारवाई शाळांच्या परिसरात राबविण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे. पुढील काळातही अशा तपासण्या नियमितपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी स्पष्ट केले. पालकांनी आपल्या पाल्यांची वाहतूक करणारी वाहने अधिकृत व नियमबद्ध आहेत की नाही, याची खात्री करूनच वाहनांची निवड करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून, याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

