वाढते वय आणि मानसिक समस्यांवर विशेष व्याख्यान
वाढते वय आणि मानसिक समस्यांवर विशेष व्याख्यान
शिवशांती स्नेहालयतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) : वाढते वय आणि त्यासोबत होणारे शारीरिक व मानसिक बदल यामुळे ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राच्या वतीने रविवारी (ता. ८) विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अलिबाग येथील भारती तरे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी “वाढते वय आणि मानसिक समस्या” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
वय वाढल्यानंतर मानसिक व शारीरिक क्षमतेवर होणारे परिणाम, सेवानिवृत्तीनंतर येणारे रिकामेपण, आर्थिक अडचणी, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे वाढलेले एकाकीपण आणि बदलती कौटुंबिक भूमिका यांमुळे निर्माण होणाऱ्या नैराश्यावर डॉ. डोंगरे यांनी सविस्तर विवेचन केले. नैराश्यामुळे उद्भवणारा निद्रानाश, भूक न लागणे, अपराधीपणाची भावना व भविष्याबाबतची निराशा यावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने, प्रार्थना, हास्य क्लबमध्ये सहभाग व पुरेशी झोप आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इतिहास संशोधक योगीराज सप्रे यांनी अलिबाग परिसरातील कुलाबा, खांदेरी, उंदेरी व कोर्लई किल्ल्यांचा इतिहास उलगडून सांगितला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे व सचिव प्रतिभा म्हात्रे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खजिनदार जगदीश थळे, सहसचिव प्रफुल्ल राऊत व मनोज पडते यांनी परिश्रम घेतले. या वेळी ६० हून अधिक सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

