सायवन भातखरेदी केंद्र सुरू

सायवन भातखरेदी केंद्र सुरू

Published on

सायवन भातखरेदी केंद्र सुरू
कासा, ता. १२ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील कासा उपप्रादेशिक विभागामार्फत आधारभूत भातखरेदी योजना (खरीप हंगाम)अंतर्गत सायवन येथे भातखरेदी केंद्र अखेर सुरू करण्यात आले आहे.
शासनाकडून आधारभूत दरानुसार प्रतिक्विंटल २,३६९ रुपये दराने भातखरेदी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली नाही, त्यांनी तातडीने संबंधित भातखरेदी केंद्रप्रमुखाकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सायवनसह गंजाड, वेती, उपलाट येथील भातखरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. घोळ येथील भातखरेदी केंद्राला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यामुळे घोळ येथील भातखरेदी केंद्र वेताळी येथे हलवण्यात आले आहे. तसेच भातखरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com