वर्षातील पहिल्याच महिन्यात मुजाेर चालकांना दणका

वर्षातील पहिल्याच महिन्यात मुजाेर चालकांना दणका
Published on

बेलापूर, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात दिवसागणिक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटना वाढत आहेत. अशातच नेरूळ, सीवूड्सदरम्यान वाहतुकीत अडथळा आणणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, दुचाकी अथवा चारचाकी वाहने चालवत असताना फोनवर बोलणे अशा चालकांवर सीवूड्स वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जानेवारीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल २२ लाख ५९ हजारांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे.

नेरूळ रेल्वे स्थानक परिसर, सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल, सीवूड्स डी मार्ट ही नेहमीची वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. वारंवार जनजागृती करूनदेखील या ठिकाणी वाहनचालकांकडून वेड्यावाकड्या गाड्या चालवणे, राजरोसपणे वाहनांची पार्किंग करणे, विनाहेल्मेट प्रवास, मुजोर रिक्षाचालक यांच्याकडून स्टँडचा वापर न करण्याचे प्रकार सुरू असतात. यामध्ये भर म्हणजे ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात तरुणांचे बाईक स्टंट. यामुळे स्थानिक नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीसह विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हीच बाब गांभीर्याने घेत सीवूड्स वाहतूक शाखेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची पावले उचलण्यात आली आहेत. दंडात्मक कारवाईसह आवश्यक जनजागृती वाहतूक पोलिसांकडून सुरू असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत वाहतुकीचे नियमदेखील वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

महिना एकूण प्रकरणे एकूण दंड
जानेवारी २,६१६ २२,५९,०००

आम्ही केवळ दंडात्मक कारवाई करीत नसून आवश्यक जनजागृतीदेखील करीत आहोत. आम्ही वाहनचालकांना आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
- मोहिनी लोखंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सीवूड्स वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com